आजच्या आपल्या या नव्या आधुनिक युगात म रणानंतर सुद्धा जी वन असते किंवा अम र त्व येते या गोष्टी आपल्याला थोतांड वाटतात. कारण वैज्ञानिक दृष्ट्या याचे अजून ठोस पुरावे आपल्याला मिळाले नाहीत, तसेच विज्ञान सुद्धा या गोष्टी शक्य नाही असे म्हटते आहे. असो आपण त्या वा दाच्या मुद्द्यावर जाण्यापेक्षा आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया.
तर मित्रांनो, आपल्या हिं दू संस्कृतीत अनेक देवदेवतांच्या कहाण्या आहेत, ज्यामध्ये आपल्याला अमर त्वाचे अनेक विविध असे संदर्भ पाहायला मिळतात. अनेक देवतांनी आणि रा क्षसांनी सुद्धा अमर त्वासाठी प्रार्थना केल्या किंवा तपश्चर्या केली असे आढळून आले आहे. आता ही गोष्ट तुम्हा लोकांमधल्या किती जणांना माहित आहे याची कल्पना नाही, पण आपल्या हिं दू पुराणांमध्ये अशा आठ पात्राबद्दल सांगितले गेले आहेत ज्यांना अमर त्व प्राप्त झाले आहे, जे अनंत काळापर्यंत जि वंत राहणार आहेत.
आपल्याला या विषयाबद्दल खरच काही माहिती नसेल तर चिं ता नसावी. आपण आज या विषयाबद्दलच जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी मनापासून तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते. या कथांवर विश्वास ठेवायचा की नाही याबद्दल प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते. पण आपल्या पौराणिक कथांकडे आपण मनोरंजनाचे खाद्य किंवा रंजक कथा म्हणून पाहिले तर काय हरकत आहे?
आपण अनेक काल्पनिक चित्रपट बघतो आणि त्याचा आस्वाद घेतो तसाच याही कथांचा आपण आस्वाद घ्यावा असे मला वाटते. उगाच त्या गोष्टींवर वा द घालून वेळ वाया घालवण्यापेक्षा हा मार्ग सोपा आहे नाही का? चला तर मग पाहूया ही अमर त्वाची कथा ज्यामध्ये आठ पात्रांना अमर त्व बहाल आहे. अमरत्व या शब्दाचा अर्थच असा आहे की मृ त्यु न येणे. आणि आपल्या प्राचीन ऋग्वेदामध्ये सुद्धा अमृ त प्राशन केल्याने अमर त्व येते अशी कथा प्रचलित आहे.
एकदा महर्षी दुर्वासांच्या शा पामुळे इंद्र आणि बाकी देवता क मजोर झाले होते. तेव्हा दा नवांनी देवतांवर आ क्रमण करून त्यांना पराजित केले. तेव्हा सर्व देवता भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांनी त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. भगवान विष्णूंनी देवतांना दानावांसोबत क्षीरसागर मंथन करून अमृ त काढण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर सर्व देवता आणि दानव समुद्रातून अमृ त काढण्याचा प्रयत्न करू लागले.
अमृ त कलश बाहेर निघताच इंद्राचा मुलगा जयंत अमृ त कलश घेऊन आकाशात उडून गेला. त्यानंतर दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या आदेशावरून दानवांनी जयंतचा पाठलाग सुरु केला. अथक प्रयत्नानंतर दानवांनी जयंतला पकडले. त्यानंतर अमृ त कलशावर आपला अधिकार सिद्ध करण्यासाठी देव व दानवांनी १२ दिवस अविरत असे यु द्ध केले.
हा यु द्ध क लह शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले आणि देवतांना अमृ त पाजले. अमरत्वाला ध र्म ग्रंथांमध्ये असा आशीर्वाद म्हटले गेले आहे की, ज्या व्यक्तीला हा आशीर्वाद मिळाला त्याचा कोणीही ना श करू शकत नाही. यामुळेच देवता कोणालाही अमर त्वाचा आशीर्वाद देत नाहीत. महाभारतातील एका श्लोकामध्ये या आठ जणांचे वर्णन करण्यात आले आहे ज्यांना अमर त्व प्राप्त आहे.
अ श्वत्थामो बलिव्र्यासो हनुमानश्च बिभीषण:।
कृप: परशुरामश्च सप्तएतै चिरजीविन:॥
सप्तैतान् सं स्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।
जी वेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित।।
तर ही आहेत पुराण कथेतील आठ पात्रे त्यांना अमर त्व प्राप्त झाली आहे:
वेद व्यास:- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या प्राचीन आणि पवित्र चार वेदांचे संपादन आणि १८ पुराणांचे रचनाकार म्हणजे वेद-व्यास! परशुराम:- परशुराम हे विष्णूंच्या दशावतारामधील अवतारांपैकी एक अवतार आहेत. ज्यांनी पृथ्वीवरील अध र्मी क्षत्रियांचा व दा नवांचा सं हार केला. यांच्या दान शिलतेवर प्रसन्न होऊन विष्णूने त्यांचा द्वारपाल होणे पसंत केले. अश्या भगवान परशुरामांना अमर त्व बहाल आहे.
मार्कंडेय:- भगवान शंकराचे परमभक्त म्हणून मार्कंडेय यांची ख्याती होती. शिव उपासना आणि महामृ त्युंजय सिद्धीने ऋषी मार्कंडेय यांनी अल्पायुवर मा त करून चिरंजीव पद प्राप्त केले. हनुमान:- श्रीरामांचे निस्सीम भक्त असणारे हनुमान यांनासुद्धा अमर त्वाचे वरदान प्राप्त झाल्यामुळे त्यांना चिरंजीव असे म्हटले जाते. अश्वत्थामा:- अश्वत्थामा म्हणजे गुरु द्रोणाचार्यांचा मुलगा. अश्वत्थामा तेजस्वी आणि दिव्य श क्तींचा प्रयोग करण्यात मी कोण होता. शास्त्रांमध्ये अश्वत्थामा अम र असल्याचे सांगण्यात आलेले आहे.
विभीषण:- विभीषण म्हणजे लंका नरेश रावणाचा लहान भाऊ. विभीषण यांनी अध र्माच्या विरोधात सुरू असलेल्या यु द्धामध्ये सत्य आणि ध र्माचे संरक्षण करत प्रभू श्रीरामांना मदत केली होती. यांना सुद्धा अमरत्वाचे वरदान प्राप्त आहे.
कृपाचार्य:- यु द्धनीतीमध्ये कुशल असणारे कृपाचार्य हे एक परम तपस्वी ऋषी होते. कृपाचार्य हे कौरव आणि पांडव दोघांचेही गुरु होते. यांनाही अमर त्व प्राप्त आहे.
राजा बळी:- राजा ब ळी हा भक्त प्रल्हादाचा वंशज. वामन अवतारामध्ये असलेल्या भगवान श्री विष्णूंना सर्व संपत्ती दान करून राजा बळी हा महादानी रूपात प्रसिद्ध झाला. याला सुद्धा अमर त्व प्राप्त झालेले आहे.