आईला अ’ग्नी तुमच्या तुम्ही द्या ! मी येणार नाही..मुलाने लाथाडले पतीने लाथाडले शेवटी पहा पुढे काय घडले..

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, दाेन महिन्यापुर्वी पुणे जिल्ह्यात अंदाजे 65 वर्षाच्या आजी मला दिसल्या. अंगावरती अगदी इज्जत झाकण्याइतके सुद्धा कपडे नव्हते. अंगावर फक्त फाटके कपड्याचे तुकडे हाेते. पुरुषासमाेर शरमेनं मान खाली जावी अशा अवस्थेत ती आजी हाेती. तीला पाहिल्या नंतर मात्र मला स्वताचीच लाज वाटली आपण काेणत्या जमाण्यात जगताेय असा प्रश्न मला पडला.

मी तिला स्वच्छ अंघाेळ करायला सांगितले आणि नविन कपडे आणून दिले, नवीन कपडे बघून तर आजी हरकुनच गेली हाेती. तिला मी माझ्यासोबत घरी घेऊन आलो. आता तिचा रोजचा दिनक्रम अगदी व्यवस्थित सुरू झाला होता. ती आजी अगदी साेज्वळ, शांत हाेती. एकदा बाेलता बाेलता म्हटंल काय आजी काय अवस्था झाली होती तुमची, कसं राहत हाेता तुम्ही.

आजीच्या डाेळ्याच्या कडा मात्र ओल्या झाल्या सुरकुतलेल्या गालावरुन अश्रु गळू लागले. हळु आवाजात आजी बोलली, काय करु लग्न झालं आणि नवर्‍यापासुन एक मुलं झालं माझी गरज संपली तसं नवर्‍यानं दुसरं लग्न केलं आणि मला साेडलं वार्‍यावरती. काबाड कष्ठ करुन माेल मजुरी करून कसबस मुलाला माेठं केलं.

मी म्हणालाे मग नवरा ? तो यायचा कधी कधी माझी गरज लागली की तेवढंच, नंतर नंतर तर मी आहे का मेले हे ही त्याने पाहिलं नाही. एवढं कष्ट करून मुलाला माेठं केलं पण ताेही मला वार्‍या वरती साेडुन गेला मग करु तरी काय गेली दहा वर्ष झाली हीच अवस्था आहे. कुणी दिलं तर खायच नाही तर ग्लासभर पाणी पिऊन दिवस काढायचे हेच सुरू आहे आजीचं रडु काही थांबेना.

आज मला कित्येक दिवसानं माझं कोणीतरी भेटल्याचा भास झाला. मी म्हणालाे निवांत रहा गं काळजी करु नकाेस तुझंच घर समज आणि रहा. तिचा सुखाचा प्रवास सुरूच झाला होता इतक्यात 22 जानेवारी पासुन तिची तब्बेत थोडी बिघडली, जेवण जात नव्हते त्यात उलट्या जु लाब सुरु झाले. डॉ क्टरांकडून औ षध ही दिले पण तरी तिला बरे वाटेना.

शेवटी 27 जानेवारीला तिला जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले पण तब्येत काही सुधारली नाही आणि 1 फ्रेबुवारीला उपचारा दरम्यान तिचे नि धन झालं. शेवटच्या क्षणी तरी काेणीतरी येईल अशी भावना ठेवुन निरोप पाठवला. मुलगा नवरा यांनी काेणतीच प्रतिक्रीया दिली नाही. तुमचं तुम्ही पहा आम्हाला फाेन करुच नका.

परत विंनती केली जन्मदाती आई गेली रे किमान शेवटंच ताेंड बघुन तरी अ ग्नी दे. आई गेल्याचं दुखं नाहीच साधा पाझर हि फु टला नाही. हाता पाया पडुन विंनती करुन तयार केलं पण पैसेचं नाहीत कसं येवु असाच निराेप आला. पाेठात गाेऴाच आला आई गेली आणि पैशाचा कसला विचार करताेयस. आता मात्र माझेच डाेळे पाणावले.

कशी दगडाची मनं झालीत ज्या आईचं दुध पिऊन माेठे झालात तिच आई आता नाही या कल्पनेने अंगावरती काटा येताे मनाची चलबिचल हाेते. विंनती करुन शेवटी आले पण पाहुण्यासारखे, आपल्या आईसाठी अगदी शेवटच्या क्षणी ही एक साडी आणावी असं वाटलं नाही. आई आता अंनतात विलीन हाेनार आहे परत ती कधीच दिसणार नाही याचे चेहर्‍यावरती कुठंही दु:ख दिसत नव्हते.

शेवटी मलाच मुलगा व्हावं लागलं तिचा शेवटचा प्रवास सन्मानाने व्हावा म्हणुन मीच अंतिम संस्काराची तयारी केली हार फुलं आणली आईची चिता रचायला सुरवात केली पण शेवटी आईच्या सरणा वरती एक फुल ही वाहण्याचे कष्ट घेतले नाहीत. शेवटी अ ग्नी दिला आणि आई अनंतात विलीन झाली. देवा नकाे देवु रे अशी मुलं ज्यांना आईची किंमत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.