आपल्याला माहित असेलच कि आपला स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व हे आपल्या राशी वरून कळते, त्यामुळे कोणताही व्यक्ती आपले हुबेहूब वर्णन करू शकतो, इतका प्रभाव हा आपल्या जी वनात या राशींचा असतो. राशी हा मानवी जी वनाचा एक आरसा आहे, कारण ज न्म झाल्यावर कुंडली काढतात त्यामध्ये हुबेहूब वर्णन आपले केलेले असते ज्याची पडताळणी जसजसे मोठे होऊ तसतशी करता येते.
या जगात प्रत्येक राशी ही कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी सं बंधित असते जर सुर्य आणि चंद्र सोडले तर प्रत्येक राशीचे प्रत्येकी दोन स्वामी असतात. तर चला आज आपण पाहूया मेष राशी बद्दल थोडस, तर संस्कृत नाव : मेष, नावाचा, अर्थ – मेंढा, प्रकार: अ ग्नि तत्व, स्वामि ग्रह: मंगळ, शुभ रंग: लाल, शुभ दिन : मंगळवार तर मेष ही राशी राशीचक्रातील पहीली रास आहे.
चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ ही या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत. या राशीच्या व्यक्ती खूप साध्या- सरळ असतात. साहसी स्वभाव ही या राशीची सर्वात मोठी खुबी आहे. या राशीच्या लोकांमध्ये उत्तम नेतृत्वगुण असतो. या राशीचे लोकं आयुष्यात येणा-या प्रसंगाना निर्भयपणे सामोरे जातात, स्वतंत्रता, उदारता, उत्साह, आशावाद, आणि धैर्य हे यांचे सकारात्मक गुण आहेत.
मेष राशीचे लोकं ह ट्टी आणि जिददी असतात. इतरांच ऐकणे पसंत करत नाहीत, स्वतःच खर करण्याच्या प्रयत्नात नेहमी असतात. क र्तबगार, व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणाऱ्या, धीट, महत्त्वाकांक्षी, क र्तबगारी यामुळे या राशीच्या व्यक्तींचा दैवापेक्षा प्रयत्नावर अधिक विश्वास असतो. हे अरसिक, रुक्ष, क ठोर, खोटी स्तुती न करणारे, आग्रह न करणारे असे असतात.
हे लोक स्वतःच्या जी वनात किंवा दुनियेत मस्त असतात. हे लोक दुसऱ्याची पर्वा न करता आपल्या कामाला अधिक महत्त्व देतात. या राशीचे लोक आपल्या परिवाराची फारशी चिं ता करत नाहीत किंवा शेजारच्या लोकांची तेवढी विचारपूस करत नाहीत, हे लोक स्वतःच्या दुनियेत असतात, ते लोकांच्या कामाची फारशी विचारपूस करत नाहीत. आपण भलं आणि आपलं भलं असं यांच असतं.
मेष राशीचा स्वामी मंगळ मानला जातो. जो धैर्य, शौर्याचे प्रतीक आहे. ९ ग्रहांपैकी त्याला सेनापतीचा दर्जा मिळाला आहे. मेष राशीच्या लोकांनी मंगळाला ब ळकट करण्यासाठी मुंगा रत्न घालावे. मेष राशीच्या व्यक्तींना स्वतःची प्रशंसा ऐकून खूपच आनंद होतो. जेव्हा त्यांच्या आवडत्या व्यक्ती त्यांच्यासाठी वेळ काढतात तेव्हा या व्यक्तींचा आनंद गगनात मावत नाही.
या राशीच्या व्यक्तींना साहस खूपच आवडतं पण त्याचबरोबर मनाला शांतताही त्यांना तितकीच प्रिय असते. यांचे व्यक्तीमत्व हे त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. तसंच या व्यक्ती अतिशय प्रेमळ आणि दयाळू असतात. आपल्या आयुष्यात स्थिरता लाभणार नाही अशी यांना सतत काळजी वाटत असते आणि कोणत्याही नात्यातून आपण वेगळे तर होणार नाही ना याचीही त्यांना चिं ता असते.
तसंच कंटाळवाणे आयुष्य जगायला या व्यक्तींना आवडत नाही. या व्यक्ती अतिशय सं वेदनशील असतात. दुसऱ्यांच्या भावना लवकर समजून घेतात. मात्र आपल्या भावना सांगताना त्यांना थोडा त्रा स होतो. इतरांना योग्य सल्ला देतात मात्र जेव्हा स्वतःवर वेळ येते तेव्हा त्याच गोष्टीमध्ये चुकतात. शुभ वार सोमवार, बुधवार आणि गुरुवार आहेत. या राशीच्या लोकांना सहसा में दूशी सं बंधित त्रा स, जसे दा ह, म स्तकशूळ वगैरे तसेच चेहऱ्याचा पक्षाघा त, नेत्रदो ष, कर्णदो ष, र क्तदा ब वाढणे असे वि कार होऊ शकतात.
तसेच या लोकांना क पटी व्यक्ती पासून सावध राहण्याची गरज असते. तसेच आपल्या जोडीदाराला सुखी ठेवण्यासाठी हे लोक काहीही करू शकतात. मात्र जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्यामुळे त्यांना काही वेळा त्रा स स हन करावा लागू शकतो. लग्नाच्या वर्षाबद्दल सांगितले तर 25, 27, 29,30 आणि 31 या वयात लग्न होतात. त्याची शुभ संख्या 1,3,5,7 आहे. शुभ रंग गुलाबी, पिवळा आणि पांढरा रंग आहे.