अश्वथामा आजही जिवंत आहे..बघा त्याचे जिवंत असण्याचे खरे रहस्य..याठिकाणी आजही तो येतो, समान्य लोकही त्याला पाहिल्याचे सांगतात

धार्मिक

अश्वत्थामा हा कौरव-पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र. असं म्हणतात की द्रोणाचार्यांना भगवान महादेवाच्या वरदानातून महादेवाइतकाच पराक्रमी असा मुलगा प्राप्त झाला, जो अश्वत्थामा होता. या वरदानामुळेच अश्वत्थामा कपाळावर एक रत्न घेऊन जन्माला आला जे त्याला भूक, तहान आणि थकवा यापासून वाचवते आणि मनुष्याशिवाय इतर सर्व सजी व प्राणिमात्रांवर वर्चस्व देते.

अश्वत्थामा हा ही द्रोणाचार्यांचा शिष्य असल्याने तो अर्जुनाप्रमाणेच श स्त्र आणि अ स्त्र विद्येत पारंगत असून तेजस्वी आणि दिव्य शक्तींचा उपयोग करण्यात निपुण होता. कौरव-पांडवांच्या यु द्धात द्रोणाचार्यांनी कौरवांचे सेनापतीपद स्वीकारल्यानंतर पांडवसेनेवर त्यांनी तिखट ह ल्ला चालू केला. पांडवांची बाजू मार खाऊ लागली.

द्रोणाचार्य यांचा आपल्या मुलात अतिशय जी व आहे हे श्रीकृष्णाला ठाऊक असते. अश्वत्थामा मे ला असे जर द्रोणाचार्यांना पटवून देता आले तर ते दिङ्‌मूढ होतील आणि यु द्ध करण्याची इच्छा त्यांना राहणार नाही असा श्रीकृष्णाचा तर्क होता. द्रोणाचार्यांना श स्त्र खाली ठेवायला लावायचा हाच एक उपाय आहे हे कृष्णाने युधिष्ठिराला पटवून दिले. तेंव्हा भीमाद्वारे अश्वत्थामा नावाच्या एका हत्तीचा व ध घडवून कृष्णाने ‘अश्वत्थामा मेला’ अशी आवई उठवली.

रणधुमाळीत सत्य कोण सांगेल असा प्रश्न द्रोणाचार्यांना पडला. तेंव्हा सर्वात विश्वसनीय सत्यवादी मनुष्य म्हणून त्यांनी युधिष्ठिराला विचारले की खरेच अश्वत्थामा मे ला काय? परंतु कृष्णाच्या सांगण्यावरून युधिष्ठिराने स्पष्ट काही न सांगता “अश्वत्थामा मेला खरा, पण ‘नरो वा कुंजरो वा'” असे उत्तर दिले. त्या वाक्यातला ’अश्वत्थामा मे ला’ एवढेच शब्द ऐकून, मा नसिक धक्का बसलेले द्रोणाचार्य यांनी श स्त्र खाली ठेवले.

दृष्टद्युम्नाने याचा फा यदा उचलत त्यांचा व ध केला. पुढे अश्वत्थाम्यानेही दृष्टद्युम्नाचा व ध करून आपल्या वडिलांच्या मृ त्यूचा बदला घेतला. अश्वत्थाम्याने महाभारत यु द्धात कौरवांचा शेवटचा सेनापती म्हणून काम पहिले यु द्ध संपल्यावर आणि दुर्योधन मृ त्यू पंथास लागला असतांना अश्वत्थाम्याने त्याला “पांडवांची शि रे का पून आणतो” असे आश्वासन दिले.

परंतु अंधार असल्याने त्याला पाच पांडवपुत्रांचीच मुंडकी आणणे शक्य झाले. आपला निर्वंश झाला हे पाहून संतप्त पांडव अश्वत्थाम्याला त्याला शोधत आले. अर्जुन व अश्वत्थामा दोघे एकमेकांवर ब्रह्मास्त्र फेकतात. यामुळे सृष्टीचा विना श होऊ नये म्हणून कृष्ण दोघांना आपापले ब्रह्मास्त्र परत घ्यायला सांगतो. परंतु अश्वत्थाम्याला अ स्त्र परत घेण्याची कला माहीत नसल्यामुळे तो अभिमन्यूची पत्‍नी उत्तरेच्या ग र्भात ते सोडतो.

यावर क्रोधित होऊन कृष्ण त्याच्या कपाळावरचा दिव्य मणी काढून घेतो आणि त्याला शा प देतो की कल्पकल्पांतापर्यंत ही जखम कपाळी घेऊन, तू ज खमेवर लावण्यासाठी तेल मागत दारोदार फिरशील आणि कपाळी ज खम घेऊन आजही तो तेल मागत वणवण फिरतो असे मानले जाते. अश्वत्थामा हा अमर झाल्यामुळे तो सप्तचिरंजीवांमध्ये गणला जातो.

अश्वथामा जि वंत असल्याचे काही पुरावे आजही आपल्याला पाहायला मिळाले आहेत. मध्य प्रदेशातील एका गावात एक डॉ क्टर राहत होता. रात्री उशिरा डॉ क्टरने त्याचा दरवाजा वाजवण्याचा आवाज ऐकला. जेव्हा त्याने दरवाजा उघडला तेव्हा त्या दाराच्या बाहेरील 12 फूट उंचीच्या व्यक्तीला पाहिले, त्यानी त्या माणसाला आत येण्यास सांगितले.

जेव्हा त्याने त्या माणसाकडे पाहिले तेव्हा त्या माणसाच्या कपाळावर मोठी ज खम झाली होती आणि त्या ज खमेतून बरेच र क्त वाहत होते. त्या डॉ क्टरांनी त्याला बसायला सांगितले आणि मलम पट्टी केली पण त्या व्यक्तीचे र क्त थांबत नव्हते. त्याला त्यांनी विचारले की तू अश्वत्थामा तर नाहीस ना? तुझे र क्त का थांबत नाहीये, असे हे त्यांनी विनोदी पद्धतीने त्या व्यक्तीला बोलले.

थोड्या वेळाने डॉ क्टर दुसरी पट्टी घ्यायला गेले आणि अशा अल्पावधीत अश्वत्थामा जो त्या व्यक्तीच्या रुपात आला होता तो अदृश्य झाला, तेव्हा डॉ-क्टरांनी त्याचा शोध सुरू केला, परंतु तो सापडला नाही. थक्क करणारी गोष्ट म्हणजे डॉ क्टरांच्या घराच्या दरवाजाची कडी ही आतून बंद होती. ज्यावरून तो अश्वत्थामा असल्याचे दर्शविते. असे कित्येक घटना मध्यप्रदेश मध्ये घडल्या आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज पर्यंत कोणी देवू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *