नमस्कार मंडळी, आपल्या हिं दू ध र्मामध्ये ब्रम्हा, विष्णू व महेश या त्रीदेवांचे अनन्य साधारण महत्त्व आहेत हे आपल्याला माहित आहेच. ब्रम्ह देव सृष्टी निर्माता, विष्णू पालन कर्ता तर शिव शंकर हे संहारक आहेत असा आपण मानतो. शंभू महादेव स्वयंभू असल्याचे आपल्याला माहित आहे.
ते अमर आहेत, म्हणजेच त्यांचा मृ त्यू कधीच होणार नाही. शिव शंभूना भोलेनाथ म्हणाले जाते. आपल्या भक्तांची क ठोर परीक्षा न घेता त्यांना त्यांची इच्छापूर्ती करण्यासाठी शंभू महादेव प्रसिद्ध आहेत. तसेच देव, दा नव, मानव, दैत्य कोणीही असो जो त्यांची निस्सीम भक्ती करेल त्याच्या सं रक्षणाची जबाबदारी शिवजी स्वतः घेतात.
समुद्र मंथनाची कथा आपण ऐकलेली आहेच. जेंव्हा देवतांच्या र क्षणासाठी हलाहल प्रश्न करावे आगळे तेंव्हा ते त्यांनी आनंदाने प्रश्न केले. ज्यामुळे त्यांचा कंठ नीळा झाला, व त्यांना नीलकंठ असे नाव मिळाले. शंकराची पूजा लिंग स्वरुपात केली जाते हे आपल्याला माहित आहेच. असे हे शंकर भगवान आहेत, आज आपण त्यांच्या उत्पत्तिचे म्हणजेच त्याच्या जन्माचे रहस्य जाणून घेणार आहोत.
होय, त्रिमूर्तिची उत्पत्ति रहस्याहून वेगळी मानता येणार नाही. अनेक पुराणांच्या मान्यतेनुसार ब्रम्हदेव आणि विष्णू हे शिवातून उत्पन्न झाले आहेत. तर शिवशंभो हे स्वयंभू आहेत. म्हणजेच ते मानवी शरीरापासून जन्मलेले नाहीत. जेव्हा सृष्टी अस्तित्वात आलेली नव्हती तेंव्हा शिवशंकर होते, आणि सर्वकाही न’ष्ट झाल्यानंतरही ते अस्तित्वात होते.
शिव जन्माच्या बाबतीत एक कथा सांगितली जाते, एकदा ब्रम्हदेव आणि विष्णू यांच्या मध्ये वा द झाला कि सर्वात उत्कृष्ट कोण? तेंव्हा त्यांना एक खांब दिसला ज्याचा शेवट त्यांना दिसत नव्हता, तेव्हाच आकाशवाणी झाली कि या खांबाचा शेवट जो शोधेल तो सर्वात श्रेष्ठ असेल. हे ऐकून ब्रम्हाने लगेच एका पक्ष्याचे रूप घेतले.
आणि स्तंभाच्या वरच्या टोकाचा शोध घेण्यासाठी आकाशात झेपावले. तर विष्णूने वराह रूप धारण करून खांबाचा शेवट शोधण्याचा प्रयत्न केला. पण या दोघांना सुद्धा यश आले नाही जेव्हा त्यांनी आपला पराभव मान्य करून शिव शंकराची वाट पहिली तेव्हा त्यांना समाजले कि शंकर हे एक परमा त्मा विश्व रूप आहेत. आणि हा खांब शंकराच्या अमरत्वाचे प्रतिक आहे.
या कथेप्रमाणेच शिव जन्माच्या इतर अनेक कथा सांगितल्या जातात. अनेकांच्या मते त्यांचा जन्म हा पृथ्वी वरील वाईट गोष्टींचा ना श करण्यासाठीच झाला आहे. तर विष्णू पूराणानुसार विष्णु स्वयंभू आहेत. त्यांच्या कपाळातील तीक्ष्णपणापासून शिवाची उत्पती झाली आहे. म्हणूनच शंकर नेहमी योग मुद्रेमध्ये असतात.
विष्णू पुराणामध्ये शिव जन्माची एक कथा सांगितली जाते ज्यामध्ये शिव शंकराच्या बालरुपाचा उल्लेख आढळतो. या कथे नुसार ब्रम्हदेवांना एकदा एका लहान बाळाची गरज होती त्यासाठी त्यांनी तपस्या केली, तेव्हा अचानक त्यांच्या मांडीवर एक बालक प्रकट झाले. व ते खूप रडू लागले, जेव्हा ब्रम्हाने त्या बाळाला त्याच्या रडण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने सांगितले कि त्याचे कोणतेही नाव नाहीये.
म्हणून मग ब्रम्हाने त्याचे नाव रुद्र असे ठेवले. पण ते बालक तरीही शांत झाले नाही कारण विचारल्यावर त्याने ते नाव आवडले नसल्याचे सांगितले, तेव्हा ब्रम्हाने अजून एक नाव दिले, अशी आठ नवे त्या बाळाला दिली गेली ज्या नावाने पुढे महादेव ओळखले जाऊ लागले ती नावे म्हणजेच रुद्र, शर्व, भाव, उग्र, भीम, पशुपति, ईशान आणि महादेव.
म्हणजेच शंकराला विष्णूंचा पुत्र मानले जाते. याचं संदर्भात विष्णू पुराण अजून एक कथा सांगते या कथेप्रमाणे, जेव्हा पृथ्वी, आकाश, पाताळासह संपूर्ण ब्रम्हांड जलमय झाले तेव्हा ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच्या शिवाय कोणीही अस्तित्त्वात नव्हते. आणि त्या पाण्यामध्ये विष्णू शेषनागावर बसून राहिलेले दिसत होते, त्यांच्या नाभी मधून ब्रम्हा प्रकट झाले.
जेंव्हा ब्रम्हा आणि विष्णू सृष्टी निर्माणा बद्दल वार्तालाप करत होते तेव्हा शंकर प्रकट झाले. आणि ब्रम्हदेवाने शिवाला ओळखण्यास नकार दिला तेव्हा विष्णूनी त्यांना दिव्यदृष्टि दिली आणि शिव जन्माची आठवण करून दिली. तसेच ब्रम्हदेवाने तेव्हा आपली चूक ओळखून शंकराची माफी मागितली आणि त्यांना आपला पुत्र म्हणून पुन्हा जन्म घेण्याची विनंती केली.
शंभो शंकरांनी हि विनंती मान्य केली, त्यानंतर ब्रम्हदेवाने सृष्टीच्या निर्माणास सुरवात केली. जेव्हा त्यांना यासाठी एका बालकाची गरज पडली तेव्हा त्यांनी तपस्या केली व शिव शंकरांचा जन्म झाला.