डोळे उघडले तेच एका अतीव वे दनेने! कळेच ना, ही वे दना मनाची की शरीराची…? नि या वे दनेच्या मुळातून वाऱ्याच्या झुळके सारखी एक नर्स पांढऱ्या शुभ्र कापडात गुंडाळलेलं माझं जग माझ्यापुढे धरून म्हणाली, “ही बघा, तुमची मुलगी!”. माझं ते इवलंसं अस्तित्व पाहून सगळ्या व्यथा-वे दना भरून निघाल्या. मी तो कापसाचा गोळा घट्ट हृदयाशी धरला. माझं पिल्लू र डायला लागलं. “ना राणी! मला कुणी नसलं, तरी तुला मी आहे.
तू रडायचं नाही बाळा.” माझं माझ्या मुलीशी असं हितगुज सुरू असतानाच डॉ क्टर आत आल्या. “काय म्हणतंय् बाळ?” त्यांना पाहताक्षणीच मला आठवलं- मी काल त्यांच्याच गाडीसमोर चक्कर येऊन पडले होते. “थॅ॑क्यू डॉ क्टर! काल तुम्ही नसतात, तर माझं काय झालं असतं?” “मी नसते, तर दुसऱ्या कुणीतरी तुला दवाखान्यात आणलं असतं. डॉ क्टर म्हणाले तुझा आई-वडिलांना कळवावे लागेल. डॉ क्टर या जगात माझं कोणी नाही. मी अनाथ आहे.
मला सासरचा नंबर दे ना ? डॉ क्टरांची नजर चुकून म्हणाली मी अविवाहित आहे. अग पण लोक काय म्हणतील याचा विचार केला आहेस का तु ? स माज कधीच तुला स्वस्थपणे जगू देणार नाही. पण मी जर जन्म दिला नसता तर खरच पुण्य मला मिळालं असत का ? स माजात उजळमाथ्याने फिरले असते, जसा आज तो फिरतोय. लग्न होऊनही किती स्त्रियांना मुलं होत नाहीत तर ती वांझ. लग्न होऊन मुलं झाली तर ते स माजाच्या मान्यतेनुसार चालतं का ?
हे सगळे स माजाने बनवले नियम आहेत. मेघना बाईच आयुष्य हे असंच असतं. आपण कितीही चांगलं वागलो तरी स माज आपल्यालाच दो षी ठरवतो. पण या मुलीला नाकारणाऱ्या भेकड माणसाचं नाव कळेल का ? त्याचं नाव आहे पंडित विश्वनाथ. हो मी त्यांच्याकडे संगीत शिकत होते. कधी त्यांच्या प्रेमात पडले कळलच नाही. प्रेमाच्या सागरात कधी वाहत गेले मला कळलेच नाही. मी त्यांना सांगितलं, पण ते म्हणाले बाळ माझं नाही.
प्रतिष्ठित घराण्याला डाग लागेल याची भीती स माजात कशी वाढवणार हा प्रश्न तुला पडला नाही का ? पडला ना खूप वेळा आ त्मह त्या करण्यासाठी नदीकाठी विचार करत बसले होते, माफ कर बाळा जन्माला येण्याआधीच मी तुझा बळी देत आहे. मी या जगात एकटीच आहे. आपल्याला समजून घेणार कोणीही नाही. पण परत मनात विचार आला असं करून कसं चालेल. तिला सुद्धा मोकळा श्वास घेण्याचा जगण्याचा हक्क आहे. तो मी तिच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.
पुढे काय करणार, मेघना म्हणाली एकदा मी विश्वनाथ तला भेटणार आहे. तिला डि स्चार्ज मिळाला. ती विश्वनाथकडे गेली. तिला बघताच त्याच्या तळपायाची आ ग मस्तकात गेली. कशाला आली आहेस. माझा काही सं बं ध नाही. एकदा बघा तरी या मुलीकडे काय कळतं त्या चिमुकल्याला वडील कोण आहे. मोठी झाल्यावर मी तिला काय सांगणार आहे. तिचे वडील कोण आहेत असं विचारल्यावर पैशाच्या प्रसिद्धीच्या मोहापायी तुम्ही स्वतःच मुल नाकारताय कठे फेडाल ही पापं.
स्त्री कितीही व्याभिचारी असली तरी ती नक्कीच सांगू शकते की तिच्या मुलाचा बाप कोण आहे ? बस खूप बोललीस यापुढे एकही शब्द ऐकून घेणार नाही. किती पैसे हवे आहेत. मी देईन तुला. विश्वनाथ तुम्ही माझ्या मुलीची किंमत ठरवत आहात. रा गात निघून गेली ती. त्या बाळाला ती घरी घेऊन आली. शेजार्यांना दुसऱ्याच्या घरात डोकवायची खूप सवय असते. शेजारी म्हणाले, अनौरस मुलीला घेऊन राहिलेली चालणार नाही. मी तिला नाकारू शकत नाही. मेघना जगाला तोंड देत होती.
पण पल्लवी देईल का ? अशीच लहान राहा म्हणजे तुला त्रा स देणार नाही हे जग. जिथे मेघनाची डिलि व्हरी झाली त्या डॉ क्टरांनी नोकरी दिली. पल्लवीला शाळेत घातलं. पल्लवी खूप हुशार आईच नाव उज्वल करत होती. एकदा तिने तिच्या वडिलांबद्दल विचारलं, जे काही खरं ते सगळं सांगितलं तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली होती. तिला सुद्धा गाण्यात रस वाटू लागला. शेवटी एका गायकाची मुलगी होती. मेघनाचा स्वप्न ती पूर्ण करत होती.
शाळा-महाविद्यालयात, कार्यक्रमात आपलं गायन कौशल्य दाखवत होती. कौतुकाचा वर्षाव होत होता. विश्वनाथला मागे टाकून या वर्षीचा कलाभूषण पुरस्कार तिला मिळाला. त्याने सुद्धा अहंकार सोडून मोठेपणाचा शेला पांघरून पल्लवीच अभिनंदन केलं आणि एक पत्र लिहून पल्लवीला भेटायची इच्छा व्यक्त केली. ते पत्र मेघनाच्या हाती पडलं. ठरल्याप्रमाणे ते घरी आले मेघनाला समोर बघतात चकित झाले. हे माझं घर आहे म्हणजे पल्लवी माझी मुलगी आहे.
मेघना प्लीज माझी दोन्ही मुलं ही वाईट वळणाची निघाली. पण या माझ्या मुलीने मात्र माझं नाव राखलं. पण घाबरू नकोस समारोहात मी जाहीरपणे सांगणार आहे, की पल्लवी माझी मुलगी आहे. पण मला आता कोणत्याही कुबड्यांची गरज नाही. पण मी तिचा बाप आहे हे कळलं तर ती वेडी होईल. त्यातच पल्लवी समोर आली आणि तिने विश्वनाथच्या पायांना स्पर्श केला. प्रणाम पंडित जी तुला सांगितलं नाही का तू माझी मुलगी आहेस.
ती म्हणाली हो सगळं सांगितले. पण मला माफ करा मी एक श्रेष्ठ गायक म्हणून तुमचा आदरच करते. पण मी बापाची जागा तुम्हाला देऊ शकत नाही. ज्यावेळी गरज होती त्यावेळी तुम्ही मला आणि माझ्या आईला सोडून गेलात. त्या बापाची मुलगी म्हणून घेण्यात मला लाज वाटते. एवढं सगळं बोलून पल्लवीने मेघनाला मिठी मा रली. चल आई तुझ्या हस्ते पुरस्कार घ्यायचं तुझ्या कष्टाचे फळ आहे.
या दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार घेण्यासाठी नाव पुकारण्यात आल कलाभूषण पल्लवी मेघना देशपांडे स्वतः मोठ होता होता तिच्या मुलीने तिचं नाव खूप मोठं केलं होतं. या कहाणीमध्ये चूक ही दोघांची होती. पण ही चूक फक्त मेघनाने सुधारली. जर विश्वनाथने सुद्धा तिची साथ दिली असती या स माजाविरुद्ध लढून, तर आज स्टेजवर तिच्या आई ऐवजी त्याचं नाव पुकारलं गेलं असतं. मुलींना फक्त एकच आहे संदेश आहे की प्रेमाला ब ळी पडू नका.