अजिंक्य जंजिरा: का छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जंजिरा जिकंता आला नाही…का किल्ला सदैव अजिंक्य राहिला…जाणून घ्या यामागील रहस्यमय कारण

लाईफ स्टाईल

महाराष्ट्र राज्य, रायगड जिल्हा, तालुका मुरुड मधील राजापुरी खाडीच्या तोंडावर थाटात उभा असलेला दुर्ग म्हणजेच जंजिरा. या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे हा किल्ला चारही बाजूने अरबी पाण्याच्या समुद्राने वेढलेला आहे. अरबी भाषेतील जझीरा या शब्दाचा अर्थ ‘बेट’. म्हणूनच की काय याला जंजिरा किंवा मुरुड जंजिरा असे म्हणतात.

सध्या आपल्याला दिसत असलेले जंजिरा किल्ल्यावरचे बांधकाम हे बुऱ्हाण खान याच्या काळातील आहे. जंजिरा किल्ल्याचे नाव ‘किल्ले मेहरूब किंवा किल्ले जंजिरा’ असे होते. सन १६२५ मध्ये मलिक अंबर मृ त्यू पावल्या नंतर २० सिद्धी राजकर्त्यांनी सुमारे ३३० वर्षे जंजिरा ताब्यात ठेवला होता. पुढे अनेकांनी हा किल्ला जिंकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

इतकेच काय तर छत्रपती शिवाजी महाराज हे देखील हा किल्ला जिंकण्यासाठी अपयशी ठरले. महाराजांच्या मावळ्यांनी जंजिरा जिंकण्यासाठी एकूण तीन स्वाऱ्या करून सुद्धा तिन्ही स्वाऱ्या अपयशी ठरल्या. तसेच या किल्ल्याला कोंडाजी बाबा फर्जंद यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला म्हणून देखील ओळखले जाते.

तसेच यानंतर या मोहिमेची कामगिरी शामराव नीलकंठ यांच्यावर सोपण्यात आली पण सिद्धिने आपल्या धूर्तपणाने आणि विश्वासघाताने पेशवे शामराव नीलकंठ यांना बंदिस्थ केले. पण त्यावेळी देखील शिवाजी महाराज्यांनी एक युक्ती लढवून बंदिस्त पेशव्यांना सोडवले त्यांनी असे सांगितले कि आम्ही पुन्हा जंजिरा किल्ल्यावर हल्ला करणार नाही. जं

जिरा हा किल्ला ३३० वर्ष अजिंक्य राहिला आणि १९४७ पर्यंत हा किल्ला त्यांच्याच ताब्यात राहिला. १६७५ मध्ये देखील शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ल्यावर हल्ला केला आणि त्यावेळी हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती येता येता राहिला. पुढे संभाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी जंजिरा किल्ल्यापासून सुमारे पाच-सहा कि.मी. अंतरावर समुद्रात एका बेटावर पद्मदुर्ग किल्ला उभारला परंतु जंजिरा जिंकण्यात त्यांनाही यश मिळाले नाही. तसेच त्यांच्यानंतर सुद्धा छत्रपती संभाजीराजे व पेशव्यांनीही स्वाऱ्या केल्या.

आज पण प्रामुख्याने बघणार आहोत ते जंजिरा अजिंक्य राहण्याचे प्रमुख कारणं:- हा किल्ला अजिंक्य राहण्याचे कारण म्हणजे या किल्ल्याची बांधणी, रचना, शिवाय किल्ल्यावर एकूण ५७२ तोफा असल्याचा उल्लेख आढळतो. जंजिरा किल्ल्याचे मुख्य आकर्षण आणि अभेद्य राहण्याचे कारण म्हणजे त्यावरील असलेली तोफ कलाल बांगडी. भारतात प्रमुख पाच तोफा आहेत त्यापैकी एक तोफ ही कलाल बांगडी.

या तोफेचे विशेष म्हणजे ही तोफ मिश्र धातूंच्या बांगड्यांपासून बनवलेली आहे. त्यामुळेच ही तोफ उन्हात देखील तापत नाही. शिवाय हि तोफ म्हणजे आग कल्लोळ असून बारा किलोमीटर अंतरापर्यंत मा रा करू शकते. लांडा कसम, चावरी अशा अनेक प्रकारच्या तोफा देखील या किल्ल्यावर आहेत. परंतु कलाल बांगडीचे विशेष महत्त्व आहे. या तोफांचे वजन सुमारे 21 ते 22 टन आहे.

या तोफे मुळे शत्रू किल्ल्याच्या जवळ सुद्धा पोहोचू शकला नाही. तसेच हा किल्ला अजिंक्य राहण्याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे समुद्राच्या पाण्यातून जसे जसे किल्ल्याच्या जवळ जावे तेव्हाच किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार दिसते. त्यामुळे शत्रूला लांबून किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसत नाही व हल्ला करणे अशक्य होते. भरीत भर या किल्ल्याला पश्चिम तटा खाली एक चोर दरवाजा आहे तो समुद्रात निघतो, याला दर्या दरवाजा असे म्हणतात.

जो संकट काळी बाहेर पडण्यासाठी वापरला जाई. शिवाय या किल्ल्याला असणारा भुयारी मार्ग. 50 ते 60 फूट खोल असलेल्या समुद्राखालून तो राजापुरी गावापर्यंत आहे. याचा वापर पूर्वी गुप्त मार्ग म्हणून होत असे. शिवबाने शर्थ केली | शंभूने प्रा ण लावला || मुघलांच्या मुळे सिद्ध्या | तुझा जंजिरा अजिंक्य राहिला || पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे संस्थान भारतीय स्वातंत्र्य मध्ये विलीन झाले…

तर आपल्याला याबद्दल काय वाटते, तसेच माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *