तिरुपती बालाजी मंदिरात लोकांनी दान केलेल्या केसांचे नेमके काय करतात…जाणून आपले सुद्धा होश उडतील

धार्मिक

आपल्याला माहित असेल कि जगातील सर्वात भव्यदिव्य, वैभवशाली, श्रीमंत मंदिर म्हणजे दक्षिण भारतातील तिरूपती बालाजी मंदिर होय, आणि आपल्यातील बरेच लोक या मंदिराला भेट देण्यासाठी आवर्जून जात असतात. हे मंदिर जेवढे श्रीमंत, वैभवशाली आणि भव्यदिव्य आहे तेवढेच तिरूपती शहराची सुध्दा भरभराट आपल्याला पहायला मिळते.

तसेच मंदिरात येणाऱ्या भक्तांची संख्या जणू अगणित आहे. आपणास सांगू इच्छितो कि दरवर्षी या मंदिराला ५ कोटीहुन अधिक देश विदेशातील लोक भेट देत असतात. तिरूपती बालाजी मंदिर हे संपूर्ण जगात हे त्याच्या श्रीमंतीसाठी, वैभवशाली संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे तसेच अनेक लोक या मंदिरात नवस बोलण्यासाठी येत असतात.

तसेच अनेक लोक अगदी श्रद्धेने कुणी नोटांची बंडलं टाकतं तर कुणी सोन्याच्या विटा-दागिने इत्यादी. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भक्त हे निनावी टाकतात. तिरुपती संस्थानच्या प्रसिद्ध “हुंडी” मध्ये अश्या अनेक सामग्रीचं दान अर्पण होत असतं. आणि येथे जमा झालेले दान मोजण्यासाठीची यंत्रणा अचाट करणारी आहे. कित्येक लोक वेगवेगळ्या चाळण्या घेऊन नोटा मोजत असतात.

तसेच आणखी एका गोष्टीचे दान हे होत असते ते म्हणजे केसांचे अनेक भाविक येथे आल्यावर आपले मुंडन करून घेतात, आणि ही प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. इतकेच काय तर अगदी अनेक महिला सुद्धा येथे आल्यावर आवडीने मुंडन करून घेतात. त्यामुळे या अर्पण केलेल्या केसांचा येते खच पडलेला असतो. मात्र अनेक लोकांना अजून सुद्धा माहित नाही कि आपण दान केलेल्या केसाचे काय होते. आणि आज आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत.

आपल्यातील अनेक लोकांना हा प्रश्न नक्कीच पडलेला असेल, पण आपणांस सांगू इच्छितो कि या केसांचा पुढे जाऊन लिलाव केला जातो. ज्यातून वर्षाला आपण दान केलेल्या केसातून बालाजी मंदिर प्रशासन हे तब्ब्ल ८० ते १०० कोटी रुपये कमावते, आणि अशा गोष्टीतून इतक्या कोट्यवधी रुपयाची कमाई करणारे बालाजी हे एकमेव उदाहरण असेल.

तसेच दरवर्षीं हा पैशांचा आकडा बदलत असतो, पण आता आपल्याला असा सुद्धा प्रश्न पडेल कि या केसाचे पुढे जाऊन काय होते. तर आपणास आम्ही सांगू इच्छितो कि या केसांचे कृत्रिम केस बनवले जातात ज्याची मागणी विदेशात खूप मोठ्या प्रमाणत आहे. अशा केसाचा उपयोग हा अनेक चित्रपटांमध्ये नायक, नायिका करत असतात. शिवाय कर्करोग झालेल्या लोकांसाठी सुद्धा या केसाचा वापर केला जातो.

तसेच या मधून मिळालेल्या पैशाचे बालाजी मंदिर प्रशासन हे अनेक शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करते, आणि येते दर्शनासाठी आलेल्या लहान मुलांना तसेच स्त्रियांना दिले जाते. तसेच काही दुधाचे तूप देखील करण्यात येते ज्याचा उपयोग हा प्रसाद बनवण्यासाठी केला जातो. तसेच आपणांस सांगू इच्छितो कि या २००० हजार जुन्या मंदिराकडे हजारो किलो सोनं आहे.

यापैकी बरंचसं सोनं हे बँकेत जमा आहे. आंध्र प्रदेशमधील तिरुपती येथील या मंदिरात तब्बल ९००० किलो सोनं असल्याची माहिती मिळते आहे. तसेच तिरुपती देवस्थानम टीटीडी चं ७२३५ किलो सोनं हे विविध जमा योजनांमध्ये देशातील दोन राष्ट्रीय कृत बँ कांमध्ये जमा आहे. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.