जाणून घ्या केव्हा आणि कशा प्रकारे ‘श्री राम’ याचा ‘मृत्यू’ झाला…तसेच त्यानंतर अयोध्येचे आणि श्री हनुमानाचे काय झाले

लाईफ स्टाईल

आपल्या सर्वाना रामायणाची संपूर्ण कथा अगदी तोंड पाठ आहे, रावणाने सीतेचे अ पहरण कशा पद्धतीने केले आणि त्यानंतर श्री राम यांनी सीतेला सोडवण्यासाठी चौदा वर्ष भो गलेला वनवास हे सर्व आपल्याला माहित आहेच पण आपल्यातील अनेक लोकांना हे माहित नाही कि श्री राम याचा मृ त्यू कसा झाला, म्हणजेच श्री राम यांनी पृथ्वीवर कशा पद्धतीने आपला अखेरचा श्वा स घेतला.

आपल्याला माहित असेल कि भगवान विष्णू हे श्री राम याचा अवतार घेऊन पृथ्वीवर आले होते, पण जेव्हा त्याचा पृथ्वीवरचा कार्यक्राळ सं पला होता तेव्हा त्यांना पुन्हा विष्णुलोकात परतावे लागले होते. आणि आपल्याला माहित आहे कि ज्याला ज न्म आहे त्याला मृ त्यू देखील आहे. यातून आजवर कोणीही वाचू शकलेले नाही, अगदी देव सुद्धा नाही. आणि आज आपण याचा बद्दल जाणून घेणार आहोत कि श्री राम याचा मृ त्यू कसा झाला आणि ते कशा पद्धतीने विष्णू लोकी परत गेले.

तर आपणांस सांगू इच्छितो कि भगवान राम यांचे आयुष्य कसे संपले ते वाल्मिकीच्या रामायणातून नव्हे तर पद्म पुराणात आहे. तसेच सीतेला ग मविल्यानंतर श्री रामाने अनेक वर्षे अयोध्येत रा ज्य केले. त्यांनी आपल्या मुलांना रा ज्याचा कारभार सांभाळण्यासाठी तयार केले, तसेच त्यांनी आपल्या कारकिर्दीत अयोध्या मधील तमाम लोकांसाठी आणि त्याच्या भरभराटी साठी अनेक मोठं मोठे यज्ञ केले.

आणि अयोध्यामधील अनेक लोक सुद्धा श्री राम याना सर्वश्रेष्ठ आणि आदर्श राजा मानत होते. पण असेच श्री राम याचे आयुष्य आनंदाने जात असताना अचानक त्यांना भेटण्यासाठी एक ज्ञानी ऋषी श्रीराम यांना भेटायला येतात आणि एकांतात भगवान राम यांच्यासह काही महत्वाचे चर्चा करण्याबाबत परवानगी मागतात. त्यानुसार ते चर्चा करण्यासाठी एकांतात बसतात. आणि ऋषींच्या सल्ल्यानुसार रामाने आपला भाऊ लक्ष्मण यांना सांगितले की आपण दारातच रहावे माझ्या आ ज्ञेशिवाय कोणलाही आत येऊ देऊ नये.

आणि श्री राम हे देखील सांगण्यास विसरत नाहीत कि जर कोणी आमच्या बोलण्यामध्ये खं ड पाडला तर त्याला मृ त्यू दं ड देण्यात येईल, तसेच भगवान रामाला भेटायला आलेले ऋषी दुसरे कोणी नाही तर काल देव होते. काल देव श्री रामाला याची आठवण करून देण्यासाठी आले की पृथ्वीवरील त्यांचा ‘वेळ’ आता सं पला आहे आणि आता त्यांनी मूळ निवासस्थान वै कुंठात परत यावे. राम आणि काल देव यांच्यातील गु प्त संभाषणा दरम्यान महर्षि दुर्वासाचे आगम न होते. महर्षि दुर्वासा आपल्या चंचल स्वभावासाठी परिचित होते.

महर्षि दुर्वासाने रामला त्वरित भेटण्यास परवानगी मागितली. लक्ष्मण महर्षि दुर्वासाला परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु महर्षि दु र्वासा ऐकायला तयार नसतात, यांना लक्ष्मणचा रा ग येतो आणि असेही म्हणतात की, जर त्यांना आत जाऊ दिले नाही तर ते लक्ष्मणला शाप देतील. लक्ष्मणला समजत नाही की, त्याने भावाच्या आदेशाचे उ ल्लंघन करावे कि शाप स हन करावा ?

पण अशावेळी लक्ष्मणाने स्वतः आत जाऊन राम यांना दुर्वासा ऋषी बाबत सांगण्याचा निर्णय घेतला. जेव्हा की त्यांना हे माहित होते की, चर्चा भं ग केल्यावर त्यांना मृ त्यु दंड देण्यात येईल. शेवटी लक्ष्मणाने खोलीत प्रवेश केला, ज्यामुळे राम आणि काल देव यांच्यातील चर्चेत खंड पडला. आणि त्यांनी पहिलाच सांगितले होते कि जर कोणी त्याच्या चर्चेत खंड पाडला तर त्यांना मृ त्यू दंड देण्यात येईल.

आता एकाबाजूला त्यांचा निर्णय होता आणि दुसरीकडे त्यांचा प्रिय लक्ष्मण. पण श्री राम यांनी आपला ध र्म पाळला आणि त्यांनी लक्ष्मणाला आपल्या राज्याच्या बाहेर हकलण्याचा निर्णय घेतला, पण लक्ष्मणाला आयोध्येतून काढून टाकणे म्हणजे काही मृ त्यूदं डापेक्षा कमी नव्हते. आणि त्यांना आपल्या मोठ्या भावापासून लांब राहणे मुळीच पसंद नव्हते, तेव्हा लक्ष्मणाने विचार केला की, अश्या जी वनाचा काय अर्थ.

असा विचार करत लक्ष्मण शरयू नदीकडे निघाले आणि त्या नदीत त्यांनी जलस माधी घेतली. नदीमध्ये जाताच लक्ष्मण याचे अनंत शेष अवतारात रुपांतर झाले आणि अश्याप्रकारे लक्ष्मण विष्णुलोकात पोहोचले. पण आपल्या आपल्या प्रिय भावाच्या विरहाने राम दु खी झाले, त्यांनी त्यांचे शा सन सोडले. आपल्या मुलांना आणि भावांच्या मुलांना सर्व सत्ता सोपवून श्रीराम यांनी देखील शरयू नदीत जलस माधी घेतली.

शरयू नदीत जाताच राम अदृश्य झाले आणि विष्णू अवतारात प्रगटले. त्यांनी सर्वांना दर्शन दिले आणि अश्याप्रकारे राम अवतार आपला पृथ्वीवरील काळ सं पवून विष्णुलोकात परतले. अशाप्रकारे श्री राम यांनी पृथ्वीवर शे वटचा श्वास घेतला आणि ते पृथ्वीवरील काळ सं पवून विष्णुलोकात परतले.

रामाने आपल्या इच्छेविरूद्ध आपल्या दे हाचा ब ळी का दिला? :- तर भगवान राम हे स्वेच्छेने आपले अस्तित्व सोडून देणारे पहिले अवतार होते, कारण त्यांनी एका आदर्श मनुष्याचे आयुष्य जगले त्यांनी लोकांच्या कल्याणसाठी अनेक कामे केली आणि त्यांना लोकांसमोर ध र्माचे एक उत्तम उदाहरण ठेवायचे होते. आणि एखाद्या रहस्यमय प्राण्याच्या हाताने हिं सक मृ त्यू त्याच्या अवतारांसाठी योग्य नव्हता. म्हणून त्यांनी नदीत सामील होऊन हा अवतार सं पवला.

Leave a Reply

Your email address will not be published.